त्रिकोणाच्या बाहेरचा कोन.........मनापासून स्वीकारलेली मनस्वी...
कोल्हापुरातील देवकर पाणंदीत माझ्या घराचे सध्या बांधकाम सुरु आहे। ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज होता. माझ्या सिध्दार्थचा वाढदिवस १२ ऑक्टोबरला. त्यामुळे नवीन घरात जावून सिध्दार्थचा वाढदिवस आणि मनस्वीला ही घरी आणावे असे ठरवले होते. परंतू एकदा तिला आपले बाळ म्हणून स्विकारल्यावर तिला संस्थेत ठेवणे मनाला पटेना. तिचे मनस्वी हे नाव सिध्दार्थने त्याच्या आवडीने ठेवलयं. तो शांतीनिकेतन शाळेत दुसरीत शिकतो. त्याच्या वर्गात एका मुलीचे हे नाव आहे. तो शाळेतून आल्यावर मम्माला म्हणाला, ""मम्मा आपल्या बाळाचे नाव मनस्वी ठेवूया॥'' झाले तेच नाव पक्क झालं. खरे तर त्याच्याही मागे एक अर्थ लपलाय. आम्ही तिघांनीही मनस्वीचा स्विकार मनापासून.. अंतःकरणापासून केलाय. म्हणूनच जिला मनापासून स्विकारली ती मनस्वी.तिला घरी आणताना आम्ही कोणताही मुहूर्त बघितला नाही की पंचांग.
काहीतरी नक्कीच वेगले ...विचाराची कक्षा विस्तृत करणारे...
गायत्री
No comments:
Post a Comment